पुणे : सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालया अंतर्गत शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी.डी.सी.अॅण्ड ए. बोर्ड) कडून दिनांक २२,२३ आणि २४ मे २०२० रोजी घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पविका (जी.डी.सी. अॅण्ड ए.) परीक्षा व सहकारी गृनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा कोरोना कोविड- १९ च्या महामारीमुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती जी.डी.सी. अॅण्ड ए. बोर्डाचे सचिव तथा सहकारी संस्थेचे उपनिबंधक महेंद्र मगर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे जीडीसी अॅण्ड ए व सी एच एम परीक्षा स्थगित
• Vidya S. Joshi