पिंपरी पालिकेच्या वतीने कोरोना वॉर रूम सज

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोरोना या संसर्गजन्य आजाराविरुध्द यशस्वी लढा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कोरोना वॉर रूमची महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाहणी केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोरोना वॉर रूम तयार करण्यात आली असून त्यामध्ये पोलीस विभागाच्या सहकार्याने शहरातील विविध ठिकाणच्या 80 CCTV चे थेट फुटेज उपलब्ध असून याद्वारे संचारबंदीच्या काळात जमा होणा-या नागरिकांवर लक्ष्य ठेवून त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होणार आहे. या वॉर रूममध्ये कोरोना संसर्गित रुग्णांची माहिती, अहवाल निगेटिव्ह आलेल्या लोकांची संख्या, एकूण रुग्ण संख्या, तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या सॅम्पलची संख्या, होम वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या, रुग्णालय निहाय पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोरोना या संसर्गजन्य आजाराविरुध्द यशस्वी लढा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कोरोना वॉर रूमची महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाहणी केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोरोना वॉर रूम तयार करण्यात आली असून त्यामध्ये पोलीस विभागाच्या सहकार्याने शहरातील विविध ठिकाणच्या 80 CCTV चे थेट फुटेज उपलब्ध असून याद्वारे संचारबंदीच्या काळात जमा होणा-या नागरिकांवर लक्ष्य ठेवून त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होणार आहे. या वॉर रूममध्ये कोरोना संसर्गित रुग्णांची माहिती, अहवाल निगेटिव्ह आलेल्या लोकांची संख्या, एकूण रुग्ण संख्या, तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या सॅम्पलची संख्या, होम वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या, रुग्णालय निहाय रुग्णांची संख्या तसेच कोरोना विषयक सर्व माहिती डॅशबोर्डवर उपलब्ध असणार आहे. गुगल मॅपद्वारे नागरिकांच्या जवळील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्या-या दुकानांची माहिती, घरपोच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणा-या दुकानांची माहिती, रात्रनिवारा, अन्नछत्र आदींची माहिती महापालिकेच्या मोबाईल अॅपद्वारे देण्याचे काम देखील या वॉर रूममधून करण्यात येणार आहे. होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांच्या हालचालींवर या वॉर रूममधून गुगुल मॅपद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.