सूर्यनारायणालाही वाटतेय पुणेकरांनी घरीच बसावे

पुणे : पुणेकरांनो, कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरातच थाबणे गरजेचे आहे. आता साक्षात सूर्यनारायणही तुम्हाला तसा आदेश देत आहे. कारण, गेल्या चार दिवसांपासून पुण्याच्या तापमान वाढत आहे. रविवारी तापमानाने थेट चाळीशी ओलांडली तर सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पारा ३८ अंश सेल्सिअसवर पोचला होता. त्यातून घरातच रहा, सुरक्षित रहा' असा जणू सल्लाच दिला आहे. ___पुण्यासह राज्यातील सरासरी तापमानात रविवारी लक्षणीय वाढ पाहायला मिळाली. पुणे शहरातही पाऱ्याने रविवारी चाळिशी ओलांडली. रविवारी दिवसभर आकाश निरभ्र व हवामान कोरडे होते. सोमवारी दुपारीही एक वाजण्याच्या सुमारास पारा ३८ अंश सेल्सिअसवर पोचला होता. __ हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी सरासरी तापमान ३७.८ अंश सेल्सिअस होते. रविवारी हेच तापमान ४१ अंश सेल्सिअस झालेले पाहायला मिळालं. लोहगाव येथे सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस; तर पाषाण येथे ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.