पुणे : राज्यातील सर्व खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संस्थांनी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रवेश देताना विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे वाढीव शुल्क आकारू नये. पालकांनी शुल्कवाढी संदर्भात काही तक्रारी असल्यास त्यांनी आपल्या जिल्ह्याच्या संनियंत्रकाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे केले आहे. राज्यातील सर्व शिक्षण संस्थांनी येत्या शैक्षणिक वर्षात (२०२०-२१) कोणत्याही शुल्कात (फी) वाढ करू नये, असे स्पष्ट आदेश शालेय शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी दिले असतानाही वाढीव शुल्काची मागणी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने आता आणखी एक पाऊल टाकले आहे. शालेय शिक्षण विभागाने आता पालकांना तक्रार नोंदविता यावी, यासाठी संबंधित भागातील अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक दिले आहेत. यात शिक्षण विभागाने जिल्हानिहाय अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. यात जवळपास ८७ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.
पुणे विभाग : मीना शेंडकर (शिक्षण उपनिरीक्षक) : ९८९०६४३२२२
पुणे विभाग : धनाजी बुटे (शिक्षण उपनिरीक्षक) : ९९२२४५८७९९
पुणे : ज्योती परिहार (उपशिक्षणाधिकारी- प्राथमिक) : ८८८८२२५३६४
पुणे मनपा : धनजंय परदेशी (उपप्रशासकीय अधिकारी) : ९४०४६०९१७.