करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे पर्यंतचा लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवला. करोनामुळे अर्थव्यवस्थेचं गाळात रुतलेलं अर्थचक्र बाहेर काढण्यासाठी केंद्र व राज्य सरकार टप्प्या-टप्प्याने उद्योग धंद्यांना परवानगी देत आहे. ४ मे पासून सुरु होणाऱ्या लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सलूनची दुकानं उघडण्यास सशर्त परवानगी देण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं. याव्यतिरीक्त इ-कॉमर्स कंपन्यांनाही या क्षेत्रात अत्यावश्यक सेवा व वस्तूंची विक्री करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये परवानगी देण्यात आलेली असली तरीही सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणं बंधनकारक असल्याचं गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे. रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काय सुरु राहील आणि काय नाही याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने नवी नियमावली जारी केली आहे. ही नियमवामली फक्त काही मर्यादित क्षेत्रात लागू असेल. यानुसार, गृहमंत्रालयाने दारुची दुकानं, पानटपऱ्या, ब्युटी पार्लर आणि सलून उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यासंबंधी काही नियम ठरवण्यात आले आहेत.
============