पुणे : पुणे शहरातील काही भागांत सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस झाला. शुक्रवारी दुपारी ४ वाजता अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे उकाड्याने आणि लोकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला. शहरातील विविध भागांसह कोथरूड, वारजे - माळवाडी, पर्वती, सहकारनगर, शिवणे भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पुणेकरांना गारवा मिळाला. मे महिन्याची आज सुरुवात झाली असताना कमालीचा उकाडा जाणवत आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी पाऊस झाल्याने लॉकडाऊनच्या काळात घरात असलेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला. पावसाच्या सोबतीला सोसाट्याचा वारा सुटला होता.
सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात अवकाळी पाऊस मंगळवार पेठेत टॉवर तसेच संचेती हॉस्पिटलजवळील दिशादर्शक कमान पडली
• Vidya S. Joshi