मुंबई. महाराष्ट्रासह देशभरातील लॉकडाउनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपुष्टात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा लॉकडाउन वाढणार असल्याचे मंगळवारीच स्पष्ट केले. परंतु, हा लॉकडाउन आधीपेक्षा वेगळा राहील असे देखील सांगण्यात आले. तरीही कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील हॉटस्पॉटमध्ये असलेल्या यात दिलासा मिळणार नाही. कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनवर घेण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्यावर विचार करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्था पीटीआयशी संवाद साधताना राज्यातील लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढणार असे संकेत दिले आहेत. ___ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची गुरुवारी बैठक घेण्यात आली. यामध्ये १७ मे नंतरचे लॉकडाउन आणि निबंध कसे असतील त्यावर चर्चा करण्यात आली. यातच मुंबई आणि उपनगरांमध्ये, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, मालेगाव आणि नाशिकमध्ये ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे.
हॉटस्पॉटमध्ये लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्याचा विचार – ठाकरे सरकार
• Vidya S. Joshi