लसीकरण पुन्हा होणार सुरू

मुंबई : फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनामुळे आपण लॉकडाऊनमध्ये आहोत. अशात कोरोनामुळे बालके आणि लहान मुलांचे लसीकरण रखडले आहे. गेल्या दोन महिन्यात अत्यंत अल्प प्रमाणात लसिकरण झाले असून पालिकेची शिबीरेही झाली नाहीत. मात्र, लसिकरण विलंबाने झाल्यास घाबरण्याचे कारण नाही असा दावा पालिकेकडून केला जात आहे. ___लसिकरणासाठी पालिका प्रत्येक आठवड्यात दोनवेळा शिबीरी आयोजित करते. मात्र, गेल्या दोन महिन्यात सदर शिबिरं घेतली गेली नाहीत. मुंबई महानगर पालिकेची संपुर्ण आरोग्य यंत्रणा कोविड प्रतिबंधाच्या कामात व्यस्त असल्याने ही शिबिर घेण्यात आली नाहीत. तसेच खासगी दवाखानेही बंद असल्याने सर्वच बालकांच्या लसिकरणाचा डोस चुकला होता. पालिकेचे दवाखाने रुग्णालये सुरु असली तरी नागरीक कोरोनाच्या भितीपोटी लहान मुलांना घेऊन दवाखान्यांमध्ये जात नव्हते.अशात आता ही शिबिर पुन्हा सुरु करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.